सरकारविरोधात 200 खासदारांचं आंदोलन

November 23, 2016 11:11 AM0 commentsViews:

NOTABANDI

23 नोव्हेंबर: नोटाबंदी प्रकरणी सरकारवर दबाव आणण्यासाठी विरोधी पक्ष आणखी आक्रमक झाला आहे. सगळ्या विरोधी पक्षांनी संसद भवन परिसरात गांधीजींच्या मूर्तीजवळ नोटाबंदी विरोधात धरणं सुरू केलंय. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीसह विरोधी पक्षाचे सगळे प्रमुख नेते या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

नोटाबंदीच्या निर्णयामुळे सप आणि बसप, द्रुमुक आणि अण्णाद्रुमुक, तृणमूल आणि डावे अशा परस्परविरोधी पक्षांना एकत्र आणण्याची किमया साध्य करून दाखवलीये.

मंगळवारी लोकसभेत नोटाबंदीविरोधात अण्णाद्रुमुकच्या वतीने स्थगनप्रस्ताव मांडण्यात आला. बिजू जनता दल आणि तेलंगण राष्ट्र समिती असे दोनच पक्ष आता नोटाबंदीचे समर्थन करीत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close