सैफ अली करतोय बाळासाठी शॉपिंग

November 23, 2016 1:16 PM0 commentsViews:

kareena9

23 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरचं काऊंट डाऊन सुरू झालंय.कधीही ती आई झाल्याची बातमी येऊन ठेपेल. पण त्याआधी सैफ अली आपल्या बाळासाठी शॉपिंग करतोय.

करिना सध्या जास्त प्रवास करू शकत नाहीय. मग सैफच ती जबाबदारी पार पाडतोय.दिल्लीच्या एका शोरूममध्ये सैफ बाळासाठी शॉपिंग करताना दिसला.एखादी वस्तू घेतली की सैफ त्याचा फोटो काढून करिनाला पाठवतोय.करिनाला आवडलं तर मग खरेदी करतो.

लंडनलाही सैफ अली एका प्रसिद्ध दुकानात बाळासाठी शॉपिंग करताना दिसला होता.

सैफ आणि करिना आपल्या बाळासाठी एक नर्सरी तयार करतायत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय डिझानर काम करतायत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close