नोटाबंदीप्रश्नी पंतप्रधानांनी निवेदन द्यावं, विरोधकांची मागणी

November 23, 2016 3:00 PM0 commentsViews:

rahul vs modi _bihar23 नोव्हेंबर : नोटाबंदीवर विरोधकांनी रेटा लावल्यानंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लोकसभेत हजेरी लावली. अधिवेशन सुरू झाल्यानंतर तेव्हापासून विरोधक मोदींच्या निवेदनासाठी सभागृहात रोज गोंधळ घालतायत. पण पंतप्रधान विरोधकांना न जुमानता सभागृहापासून दूर राहिले. अखेर आज त्यांनी हजेरी लावली.

आता त्यांनी नोटबंदीवर सविस्तर निवेदन करावं अशी मागणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, बसपाच्या मायावतींसह सगळ्यांनी केलीय. विशेष म्हणजे नोटबंदीचा निर्णय म्हणजे एक मोठा घोटाळा असून त्याची माहिती भाजपाच्या खास लोकांना अगोदरच माहित होती असा आरोपही राहुल गांधींनी केलाय.

मायावती यांनी मोदींनी लोकांची माफी मागावी अशी मागणी केलीय. तर दुस-या बाजुला सभागृहाच्या बाहेरही विरोधकांनी आज संसद परिसरातल्या गांधी पुतळ्याजवळ सरकारच्याविरोधात आंदोलन केलंय. आतापर्यंत पार पडलेल्या अधिवेशनात विरोधक सरकारला धारेवर धरण्यात यशस्वी होताना दिसत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब झालंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close