‘सहकार कोंडी’ फुटली, जिल्हा बँकांना 21 हजार कोटींची रसद पुरवली

November 23, 2016 3:16 PM0 commentsViews:

Shaktikanta Das EAS23 नोव्हेंबर : सहकारी बँकांनी आवाज उठवल्यानंतर अखेर केंद्र सरकारनं आज जिल्हा सहकारी बँकांना 21 हजार कोटी रूपये उपलब्ध करून दिले आहेत. नाबार्डच्या मार्फत हे चलन बँकांना पोहचवण्यात येतंय. विशेष म्हणजे दीड लाख पोस्ट ऑफिसेसमध्येही नव्या नोटा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर रिझर्व्ह बँकेनं जिल्हा सहकारी बँकांना नोटा स्वीकारण्यास मनाई केली होती. जिल्हा बँकेच्या सहकार कोंडीमुळे विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेनं सहकारी कोंडी फोडावी अशी मागणी केली. मात्र, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सहकारी बँकांना नोटा स्वीकारण्यास परवानगी दिली. अखेरीस नाबार्डमार्फत सहकारी बँकांना निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे सहकारी बँकांना मोठा दिलासा मिळाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close