डेबिट कार्डवर 31 डिसेंबरपर्यंत सेवा शुल्क नाही

November 23, 2016 3:45 PM0 commentsViews:

debit_Card23 नोव्हेंबर : नोटाबंदीमुळे व्यवहार आणखी सुरळीत व्हावा यासाठी आता ऑनलाईन शॉपिंग करताना डेबिट कार्डवर लागणारे सेवा शुल्क 31 डिसेंबरपर्यंत माफ करण्यात आले आहे. तसंच पेटीएम आणि इतर डिजिटल वॉलेटमध्ये 20 हजारांपर्यंतची रक्कम जमा करता येईल अशी माहिती अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी केलीये.

नोटाबंदीच्या निर्णय घेत असताना कॅशलेस व्यवहार व्हावा अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलून दाखवली होती. नोटाबंदीच्या निर्णयामुळे ऑनलाईन खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीये. त्यामुळेच आता जे मोबाईलद्वारे व्यवहार करतात त्यावर आता 31 डिसेंबरपर्यंत कुठलाही सेवा कर लागणार नाही. देशात जवळपास 60 टक्क्यापेक्षा जास्त मोबाईल हे स्मार्टफोन आहेत आणि त्याद्वारे आर्थिक व्यवहार होऊ शकतात. विशेष म्हणजे कालच रेल्वेनंही ऑनलाईन बुकिंगवरचा सेवा कर बंद केलाय. त्यानेही मोठा दिलासा मिळालाय. देशभरातले 82 हजार एटीएम्स हे नव्या नोटांना सुसंगत केल्याची माहितीही अर्थसचिवांनी दिलीय.

डिजिटल व्यवहारांवर भर
31 डिसेंबरपर्यंत सर्व टॅक्स हटवण्याचा निर्णय
रुपे आणि डेबिट कार्डांवरचे सरचार्जही हटले
पेटीएम आणि इतर डिजिटल वॉलेटमध्ये 20 हजारांपर्यंतची रक्कम जमा करता येईल.
फोनवरुन केलेल्या ट्रान्झॅक्शनवर कोणताही सर्व्हिस चार्ज लागणार नाही
31 डिसेंबरपर्यंत बँकेच्या डिजिटल व्यवहारावर सेवा शुल्क आकारला जाणार नाही
31 डिसेंबरपर्यंत रेल्वे तिकीटांच्या बुकिंगवर सरचार्ज आकाराला जाणार नाही.
आतापर्यंत 82 हजार एटीएम रिकॅलिब्रेट झाले असून काही दिवसांतच सर्व एटीएम रिकॅलिब्रेट होतील


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close