सचिन ट्विटरवर…

May 5, 2010 5:21 PM0 commentsViews: 4

5 मे

बातमी आहे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबद्दलची…सचिन टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळत नाही. पण या सुट्टीच्या काळात आपल्या तमाम फॅन्सच्या तो आणखी जवळ आलाय तो ट्विटरच्या माध्यमातून.

सचिनने काल रात्रीच ट्विटरवर अकाऊंट उघडलंय. आणि फॅन्सनीही त्याला तुफान प्रतिसाद दिलाय हे सांगायलाच नको.

फोटोग्राफर अतुल कसबेकरने सचिनला ट्विटरवर येण्याचं पहिलं आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर टीममधला सहकारी झहीर खाननेही जाहीरपणे सचिनला तसं आवाहनच केलं. आणि त्यानंतर मंगळवारी मध्यरात्रीनंतर मास्टरब्लास्टर अधिकृतपणे ट्विटरवर अवतरला. ट्विटरवरची इनिंग सचिनने सुरु केली ती वेस्ट इंडिजमधल्या सहकार्‍यांना शुभेच्छा देऊन…

ट्विटरवरची सचिनची इनिंगही त्याच्या मैदानावरच्या अनेक इनिंगसारखीच मोठी असणार हे नक्की. कारण पहिल्या तीन तासातच सचिनने फटकेबाजी सुरु केली. सचिन या हक्काच्या सुटीत काय करतोय हे त्याने फॅन्सना सांगितलंच. शिवाय फोटोही अपलोड केले. सकाळी विरेंद्र सेहवागला मुलगा झाल्याची बातमीही सचिननेच फोडली.

सचिन ट्विटरवर आलाय ही बातमी मग वार्‍यासारखी त्याच्या फॅन्समध्ये पसरली. आणि काही तासातच 47 हजारांपेक्षा जास्त फॅन्सनी सचिनला फॉलो करायला सुरुवात केली. क्रिकेटच्या मैदानावर सचिनने बॅटिंगचा प्रत्येक रेकॉर्ड मोडलाय. आता ट्विटरवर तो किती रेकॉर्ड मोडतो ते बघायचं.

close