परिणय फुकेंच्या विजयी रॅलीत कुख्यात गुंड संतोष आंबेकर सहभागी

November 23, 2016 3:51 PM0 commentsViews:

funke_ambekar

23 नोव्हेंबर : विधानपरिषद निवडणुकीत भंडारा गोंदिया निवडणुकीत बाजी मारणा-या परिणय फुकें यांच्या विजयी रॅलीत कुख्यात गुंड संतोष आंबेकर सहभागी झाल्याने खळबळ उडालीय. फुके यांच्या प्रचारातही आंबेकरचा सक्रिय सहभाग असल्याची बाबही यानिमित्ताने उघड झालीये.

गुंड संतोष आंबेकरवर 4 वेळा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलीये. खून, खंडणी, अपहरण असे अनेक गंभीर गुन्हे संतोषच्या नावावर दाखल आहेत. फुके हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातायत. त्यांंच्याच मिरवणुकीत कुख्यात गुंड सहभागी झाल्यामुळे गोंदिया भंडारामधील कायदा सुव्यवस्थेची काय अवस्था होईल याची कल्पनाच न केलेली बरी. .


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close