‘डॅडी’मध्ये अर्जुन रामपाल डॅडी,फरहानची भूमिका नाही

November 23, 2016 5:52 PM0 commentsViews:

farhan-arjun01

23नोव्हेंबर: अरुण गवळीवरच्या ‘डॅडी’ सिनेमात अर्जुन रामपाल मुख्य भूमिकेत आहे.याच सिनेमात फरहान अख्तर दाऊदची भूमिका करतोय अशी बातमी पसरलीय, याचं अर्जुनला आश्चर्य वाटतंय.
या सिनेमात अर्जुन रामपाल अरुण गवळीची भूमिका साकारतोय.
अर्जुन म्हणाला,’सिनेमात फरहान अख्तर दाऊद साकारतोय, हे कुणी पसरवलं काही कळत नाही. माझ्यासाठी आणि सिनेमासाठी ही आश्चर्याची गोष्ट आहे.’
डॅडीच्या भूमिकेतले अर्जुनचे फोटोही लीक झाले.त्याबद्दल अर्जुननं खेद व्यक्त केला.
‘डॅडीचा माझा लूक चुकीच्या पद्धतीनं लीक झालाय. आम्हाला तो वेगळ्या,खास पद्धतीनं पुढे आणायचा होता.’
सिनेमात अरुण गवळीच्या आयुष्यातला 20 ते 60वर्षांचा काळ दाखवलाय. इटलीचे मेकअप आर्टिस्ट अर्जुन रामपालच्या लूकवर काम करतायत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close