जशाच तसे, भारतीय सैन्याच्या गोळीबारात 3 पाकिस्तानी जवान ठार

November 23, 2016 6:19 PM0 commentsViews:

 loc_border23 नोव्हेंबर : काश्मीरमधल्या माच्छील क्षेत्रात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात काल 3 जवान शहीद झाले. संतापजनक बाब म्हणजे पाकिस्तानी सैन्याने एका भारतीय जवानाचा शिरच्छेद केला. याला भारतीय लष्कराने चोख उत्तर दिलंय. भारतीय सैन्याने एका कॅप्टनसह 2 पाकिस्तानी जवान टिपले आहे.

आज नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराने जोरदार गोळीबार केला. पूँछ, राजौरी, माच्छिल आणि केल या क्षेत्रातल्या पाकिस्तानी लष्करी तळावर भारतीय सैन्याने हल्ला चढवला. या गोळीबारात पाकिस्तानचे 2 जवान आणि एक कॅप्टन ठार झालेत.

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने सीमारेषेवर सातत्याने गोळीबार चालवलाय. भारतीय लष्करही पाकिस्तानी सैन्याला चोख उत्तर देतंय. पण तरीही पाकिस्तानचे कारनामे सुरूच आहेत. काश्मीरमधल्या माच्छिल क्षेत्रात काल एका जवानाचा शिरच्छेद करण्यात आला.

याआधीही 29 ऑक्टोबरला पाकिस्तानने भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना केली होती. पाकिस्तानच्या अशा भ्याड कृत्यांनी सडेतोड उत्तर दिलं जाईल, असा इशारा भारतीय लष्कराने दिलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close