‘जनधन’मध्ये ‘काला’ धन ?

November 23, 2016 8:17 PM0 commentsViews:

jandhan_black_mony423 नोव्हेंबर : प्रत्येक नागरिकाचं बँकेमध्ये खातं असावं या उद्देशाने देशभरात जनधन योजना राबवण्यात आली. पण नोटबंदीनंतर याच जनधन खात्यांमध्ये तब्बल 21 हजार कोटी रुपये जमा झालेत आणि त्यामुळेच जनधन खात्यात काळा पैसा आला असण्याचा संशय आहे. अवघ्या काही दिवसांत हे पैसे जमा झाल्याने ही जनधन खाती आता चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

जनधन योजनेमध्ये देशभरात 24 कोटी बँक खाती उघडण्यात आलीयत. या खात्यांमध्ये काही दिवसांपूर्वी खडखडाट होता. ज्यांची बँक खाती नाहीत अशा नागरिकांसाठी खात्यात एक रुपये टाकून खाती उघडली जात होती. पण आता इतक्या कमी दिवसात या खात्यांमध्ये 21 हजार कोटी रुपये जमा झाले. यापैकी पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमधल्या खात्यांमध्ये जास्त प्रमाणात पैसे जमा झालेत, असं अर्थमंत्रालयाने जाहीर केलंय.

नोटबंदीचा निर्णय काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी घेण्यात आलाय. पण हाच काळा पैसा जनधन खात्यांच्या माध्यमातून पांढरा केला जातोय, असा सरकारला संशय आहे. अशा संशयास्पद व्यवहारांवर आयकराची सवलत मिळणार नाहीच उलट दंडच ठोठावला जाईल,असंही अर्थमंत्रालयाने म्हटलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close