मोदींच्या नोटाबंदी निर्णयाला 90 जनतेचा पाठिंबा

November 23, 2016 8:34 PM0 commentsViews:

pm_modi32323 नोव्हेंबर : नोटबंदीच्या निर्णयावर नागरिकांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी सरकारने ‘नरेंद्र मोदी’ ऍपचा वापर केलाय. यामध्ये नोटबंदीच्या निर्णयाला 90 टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांनी पाठिंबा दिलाय.

अचानक नोटाबंदीमुळे देशभरात एकच गोंधळ उडाला. 500 आणि 1000 च्या नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहे. विरोधकांनी नोटाबंदीविरोधात भाजप सरकारला धारेवर धरलंय. पण, देशाची 90 जनता ही मोदींच्या बाजूने असल्याचं समोर आलंय. ‘नरेंद्र मोदी’ ऍपवर नागरिकांनी या निर्णयाला जोरदार पाठिंबा दिलाय. 24 तासांत 5 लाख नागरिकांनी या ऍपवर आपलं मत नोंदवलंय. या ऍपवर काही प्रश्न देण्यात आले होते. त्याची उत्तरं नागरिकांनी दिलीयत. यारून नागरिकांचा या निर्णयाला पाठिंबा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय.

‘नरेंद्र मोदी ऍप’ वर नागरिकांची मतं
नोटबंदीमुळे कोणताही त्रास नाही – 43 टक्के
नोटबंदीमुळे त्रास झाला तरी हरकत नाही – 48 टक्के
नोटबंदीमुळे जास्त त्रास झाला – 8 टक्के


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close