भुजबळांची अँजिओग्राफी करण्यात येणार

November 23, 2016 10:14 PM0 commentsViews:

bhujbal_3223423 नोव्हेंबर : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार आहे. याबद्दल मुंबई इस्पितळाचे संचालक डॉ. बी.के.गोयल यांनी जेजे रुग्णालयाला पत्र लिहिली आहे.

 महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी छगन भुजबळ आर्थर रोड तुरुंगात कोठडीत आहे. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आधी जेजे रुग्णालय आणि त्यानंतर मुंबई इस्पितळात दाखल करण्यात आलं. 2 नोव्हेंबरपासून त्यांच्यावर मुंबई इस्पितळात उपचार सुरू आहे. भुजबळांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांची अँजिओग्राफी करावी लागणार आहे अशी माहिती बी.के.गोयल यांनी दिली. याबद्दल गोयल यांनी ‘अँजिओग्राफीसाठी’ जे.जे. रूग्णालयाला पत्र पाठवलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close