भारतीय वंशाच्या निकी हॅली अमेरिकेच्या यूएनमधल्या दूत

November 23, 2016 9:55 PM0 commentsViews:

niki_hely4 23 नोव्हेंबर : भारतीय वंशाच्या निकी हॅली यांची अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रांमधल्या दूत म्हणून निवड झालीय. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी निकी हॅली यांची या पदासाठी निवड केलीय. डॉनल्ड ट्रम्प यांनी केलेल्या नेमणुकांमध्ये संधी मिळालेल्या त्या पहिल्याच भारतीय महिला ठरल्यायत. निकी हॅली यांना मिळालेलं पद हे अमेरिकेच्या कॅबिनेट मंत्रिपदाच्या दर्जाचं आहे.

निकी हॅली या रिपब्लिकन पक्षाच्या आघाडीच्या नेत्या आहेत. पण आपल्या प्रचारमोहिमेमध्ये त्यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली होती. त्या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रिपदाच्या शर्यतीतही होत्या. निक्की हॅली या नॉर्थ कॅरॉलिना राज्याच्या दोनदा गव्हर्नर राहिल्या आहेत. त्याचबरोबर अमेरिकेतल्या सर्वात तरुण गर्व्हर्नर होण्याचा मान त्यांना मिळालाय.

कोण आहेत निकी हॅली ?
– मूळ नाव : निम्रत रंधावा
– जन्म : 20 जानेवारी 1972
– पालक : राज कौर रंधावा, अजित सिंग रंधावा
– आधी रसायन क्षेत्रात नोकरी
– 2004मध्ये रिपब्लिकन पक्षात प्रवेश
– 2 वेळा नॉर्थ कॅरोलिना राज्याच्या गव्हर्नर
– परिवार : पती आणि 2 मुलं


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close