टोमॅटोचे भाव घसरले, शेतकऱ्यांना जबरदस्त फटका

November 24, 2016 10:14 AM0 commentsViews:

TOMATO NEW

24नोव्हेंबर: कांद्यापाठोपाठ  आता टोमॅटो तसंच भाजीपाला उत्पादक शेतकरी लालेलाल झालाय आणि त्याला कारण आहे ते टोमॅटोचे पडलेले भाव. नवी मुंबईत एपीएमसी मार्केटला टोमॅटोचे भाव 2 ते 5 रूपये किलोवर घसरलेत तर नाशिकमध्ये 1 रूपया किलोवर भाव गेल्याचं दिसून आलंय.

चाकणला तर शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिलेत. टोमॅटोच्या पिकासाठी जेवढा खर्च केला तेवढाही निघत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. टोमॅटोचं मोठ्या प्रमाणात झालेलं उत्पादन तसंच नोटाबंदीनं निर्माण झालेली रोकडची चणचण यामुळे शेतकऱ्यांना फटका बसल्याचं सांगितलं जातंय.

विशेष म्हणजे अनेक ठिकाणी मार्केटमध्ये टोमॅटोचं पिक मोठ्या प्रमाणात पडून आहे. कांद्याचीही स्थिती अशीच आहे. अनेक ठिकाणी कांदा पडून आहे आणि तो नासतोय. मेथी, पालकची किंमतही दीडदमडीवर आलीय.. खुल्या बाजारात टॉमॅटो दहा रूपये किलोनं विकले जातायत. कांद्याचाही असाच भाव आहे. दोन्ही पिकांमुळे शेतकरी देशोधडीला लागतोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close