टोकाची भूमिका घेण्यास मागेपुढे पाहणार नाही-उद्धव ठाकरे

November 24, 2016 4:25 PM0 commentsViews:

uddhav_thackery_mafi24 नोव्हेंबर : ज्या जनतेने तुम्हाला मोठ्या आशेने निवडून आणले. त्यांच्या डोळ्यात तुम्ही अश्रू आणलेत. हे सरकार लोकांचं आहे असं वाटत नाही. त्यामुळे टोकाची भूमिका घेण्यास मी मागेपुढे पाहणार नाही असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला.

मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या 3 नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांनी नोटाबंदीवरुन भाजपवर निशाणा साधला. ब्रिटनमध्ये ब्रेक्सिट जनमत चाचणीमुळे राष्ट्राध्यक्षांनी पायउतार व्हायचा निर्णय घेतला होता. इथे तसं होणार आहे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थिती केला.
जनतेच्या डोळ्यात अश्रू असताना भावूक होण्यात काय अर्थ आहे, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला.

तसंच त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विधानाचं समर्थनही केलं. मनमोहन सिंह हे नावाजलेले अर्थतज्ज्ञ होते, त्यामुळे त्यांचे मत गांभीर्याने घ्यावेच लागेल. काळ्या पैशाची वसुली करताना पंतप्रधानांच्या मनात काही काळंबेरं आहे का याची शंका येतेय असा संशयही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

जनतेचे अश्रू तुम्ही का पुसले नाही. ज्या जनतेने तुम्हाला मोठ्या आशेने निवडून आणले, त्यांच्या डोळ्यात तुम्ही अश्रू आणलेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 1000 आणि 500 रुपयांची जुन्या नोटा पेट्रोलपंप, हॉस्पिटल वापरण्यासाठी ती पण पुरेल असं वाटत नाही. त्यामुळे सरकारने 31 डिसेंबरपर्यंत नोटा स्वीकारण्याची मुदत द्यायला पाहिजे अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close