माफीच्या कायद्यात बदल होणे गरजेचे

May 6, 2010 11:51 AM0 commentsViews: 3

6 मे

फाशीची शिक्षा झालेल्या अजमल कसाबला आपल्या येथील कायद्यानुसार माफी मागण्याचा हक्क निश्चित आहे. पण त्याला दहशतवादी गुन्ह्यातून फाशी झालेली आहे. आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांना फाशी लवकर होण्यासाठी संबंधित कायद्यातच बदल होणे गरजेचे आहे, असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज 'आयबीएन-लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.

कारण फाशीच्या प्रकियेसाठी आपल्याकडे बराच वेळ लागतो. शिवाय दयेचे अर्जही बराच काळ प्रलंबित राहतात. त्यामुळे किमान अशा प्रकारच्या दहशतवादी गुन्हेगारांना फाशी झाली, तर त्यांच्यासाठी या कायद्यात बदल करणे गरजेचे आहे. त्यातून भविष्यात कोणीही असे गुन्हे करण्यास धजावणार नाही, असे मत निकम यांनी व्यक्त केले.

त्याच वेळी आपल्याकडे कायद्याचे राज्य आहे. आपल्या येथे शिक्षा न्यायपालिका ठरवते. एखाद्याने दुसर्‍याचा डोळा काढला म्हणून त्याचा डोळा काढण्याची शिक्षा आपल्याकडे दिली जात नाही.

कसाब कदाचित हायकोर्टात अपिल करेल. पण त्याला देण्यासाठी लोकांच्या मनात असणारी शिक्षा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासनही निकम यांनी यानिमित्ताने दिले.

close