चीनमध्ये ऊर्जाप्रकल्पाचं बांधकाम कोसळलं, 67 जणांचा मृत्यू

November 24, 2016 5:26 PM0 commentsViews:

chaina_4424 नोव्हेंबर : चीनमध्ये ऊर्जाप्रकल्पाचं बांधकाम कोसळल्यामुळे 67 जणांचा मृत्यू ओढवलाय. या ऊर्जाप्रकल्पामध्ये कूलिंग टॉवरचं बांधकाम सुरू होतं. तेव्हा हा अपघात झाला. चीनमधल्या जिंगझाई प्रांतात हा अपघात झालाय. अपघातानंतरचं बचावकार्य सुरू आहे.

गेल्या काही वर्षांत चीनमध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा प्रकल्प उभारले गेलेत. अशा प्रकारचे औद्योगिक क्षेत्रातले अपघात इथे वारंवार घडत असतात. याआधी ऊर्जानिमिर्ती प्रकल्पांमध्ये स्फोट होण्याच्या घटना घडल्यायत. आणि आता या ऊर्जा प्रकल्पाचं बांधकाम कोसळण्याची दुर्घटना घडलीय.

या प्रकल्पामध्ये 168 मीटर उंचीचे दोन कूलिंग टॉवर्स बांधण्यात येत होते. या प्रकल्पात कोळशावर वीजनिमिर्ती करण्यात येते. एक हजार मेगावॅटचा हा प्रकल्प आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close