जगातल्या प्रभावशाली महिलांमध्ये बेबी डॉल

November 24, 2016 6:05 PM0 commentsViews:

sunny_Leone_GE_24112016

24 नोव्हेंबर: अभिनेत्री सनी लिऑनला बीबीसीच्या 100 प्रभावशाली महिलांमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे.तिच्यासोबत इतर 4 भारतीय महिलांचंही या यादीत नाव आहे.या 100 महिलांमध्ये उद्योजक,इंजीनियर,खेळाडू आणि फॅशन क्षेत्रातल्या महिलांचा समावेश आहे.

गेल्या पाच वर्षांपासून सनी बॉलिवूडमध्ये काम करतेय.तिची ओळख पोर्नस्टार म्हणून असली तरीही हळूहळू तिचा उल्लेख लोक अभिनेत्री म्हणून करायला लागले.2011च्या बिग बॉसमधून तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.जिस्म 2,जॅकपॉट,रागिणी एमएमएस 2 आणि एक पहेली लीला या चित्रपटांमधून तिने काम केलं आहे. बीबीसीच्या 100 प्रभावशाली महिलांमध्ये तिचं नाव हा तिचा विशेष सन्मान आहे.

या यादीत सनीसोबत गौरी चिंदरकर (कम्प्युटर इंजिनियर,सांगली), मल्लिका श्‌्ा्रीनिवासन (उद्योजिका,चेन्नई),नेहा सिंग (अभिनेत्री-लेखिका,मुंबई) आणि सालुमरदा थिमक्का (समाजसेविका,कर्नाटक) या चार भारतीय महिलांचा समावेश आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close