मुख्याध्यापक ‘आॅन ड्युटी फुल टाईट’, शाळेतच आणली बाटली

November 24, 2016 7:22 PM0 commentsViews:

jalgaon424 नोव्हेंबर: शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. पण, काही शिक्षक हे शिक्षकीपेशालाच काळीमा फासत आहे. जळगावमध्ये एका आश्रम शाळेतील मुख्याध्यापकच रोज शाळेत दारू पिऊत येत असल्याचं समोर आलंय.

अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक बंसीलाल सेंदाने हे रोज दारू पिऊन शाळेत येत होते. आज तर त्यांनी कहरच केला. चक्क शाळेतच दारू पिऊन दारुची बाटलीही शाळेत आणली होती. पालकांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी या मुख्याध्यापकाला घेराव घातला. पण, तर्राट मुख्याध्यापकांनी तुम्हाला काय करायचे ते करा मी घाबरत नाही अशी दमबाजीच केली.

मुख्याध्यापक रोज दारू पिवून येत असल्यामुळे या आश्रम शाळेतील मुला,मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे. यामुळे पालक,सहकारी शिक्षक त्रस्त झाले असून या मुख्याध्यपकवर कार्यवाहीची मागणी करता आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close