500ची जुनी नोट 15 डिसेंबरपर्यंत चालणार, एक हजाराची नोट बाद

November 24, 2016 10:09 PM0 commentsViews:

nashik_100024 नोव्हेंबर : नोटाबदलीमुळे त्रस्त सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं काही निर्णय जाहीर केलेत. त्यानुसार रेल्वे तिकीट आरक्षण, पेट्रोलपंप, हॉस्पिटल अशा अत्यावश्यक सेवांसाठी 15 डिसेंबरपर्यंत जुन्या पाचशेच्या नोटा चालणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शालेय फी साठीसुद्धा जुन्या नोटा चालणार आहेत. पण एक हजाराची जुनी नोट चालणार नाही. शिवाय बँकेत नोटा बदलून मिळणार नाहीत. त्या नोटा बँकेत डिपॉझिट करुन खात्यातून पैसे काढता येणार आहेत. चलनतुटवड्यामुळे सामान्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैशाविरोधात जोरदार मोहिम हाती घेत 500 आणि 1000 च्या नोटा वापरातून रद्द केल्या. या निर्णयामुळे देशभरात एकच हाहाकार उडाला. बँकाबाहेर आणि एटीएम मशीनबाहेर लोकांची एकच झुंबड उडाली. अजूनही लोकांच्या रांगा कमी झालेल्या नाहीत. लोकांची गैरसोय कमी करण्यासाठी रोज नव्या नव्या घोषणा करण्यात आल्यात. विरोधकांनी लोकांच्या गैरसोयीचा मुद्दा हाती घेत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

संसदेत नोटाबंदीवरुन रणकंदन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कॅबिनेटची बैठक घेतली. या बैठकीत सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन आता 1000 च्या नोटा हद्दपार करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. 15 डिसेंबरपर्यंत आता 1000 च्या नोटेचं आयुष्य असणार आहे.

त्यानंतर 1000 नोट कायमची चलनातून बाद होणार आहे. अत्यावश्यक सेवांसाठी 15 डिसेंबरपर्यंत 500 रुपयांच्या जुन्या नोटा देता येणार आहे. तसंच रेल्वे तिकीट, पेट्रोलपंपावर 15 डिसेंबरपर्यंत 500 रुपयांच्या जुन्या नोटा घेणार आहे. आता 1000 रुपयांची नोट कुठेही चालणार नाही फक्त 1000 रुपयांची नोट बँकेतच भरावी लागणार आहे.

नोटबंदीबद्दल महत्त्वाचे निर्णय
उद्यापासून बँकांमध्ये जुन्या नोटा बदलून मिळणार नाहीत
आपल्याकडच्या जुन्या नोटा बँकेत भरता येतील पण बदलून मिळणार नाहीत.
अत्यावश्यक सेवांसाठी 15 डिसेंबरपर्यंत 500 रुपयांच्या जुन्या नोटा देता येणार
रेल्वे तिकीट, पेट्रोलपंपावर 15 डिसेंबरपर्यंत 500 रुपयांच्या जुन्या नोटा घेणार
सरकारी शाळांमध्येही 500 रु. च्या जुन्या नोटा स्वीकारणार
1000 रुपयांची नोट कुठेही चालणार नाही
1000 रुपयांची नोट बँकेतच भरावी लागणार


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close