नवी मुंबईत दोन केमिकल कंपन्यांना मोठी आग, जीवित हानी नाही

November 25, 2016 8:36 AM0 commentsViews:

Navi Mumbai

25 नोव्हेंबर : नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीत एकाचवेळी दोन केमिकल कंपन्यांना मोठी आग लागली. रायगड आणि पॉलिडायनो अशी या दोन कंपन्यांची नावं आहेत.

आज सकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या आगीची माहिती अग्निशमनदलाला मिळताच अग्निशामक दल रवाना झाले. पण आग मोठी असल्याने जास्तीच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तीन तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलं.

या आगीत सुदैवाने काहीही जीवित हानी झाली नाही. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close