काळा पैसा लपवायला वेळ दिला नाही म्हणून निर्णयावर टीका – पंतप्रधान

November 25, 2016 1:58 PM0 commentsViews:

Narendra modi BRICS

25 नोव्हेंबर :  नोटाबंदीच्या निर्णयाआधी पूर्वतयारी केली नाही अशी टीका करणाऱ्या विरोधकांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फटकारलं आहे. संविधान दिनानिमित्त संसद भवनात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात पंतप्रधान बोलत होते. तसंच, ‘कॅशलेस’ अर्थव्यवस्था ही काळाची गरज झाली आहे, असं नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कॅशलेस’ होण्याचा संदेश आज दिला.

‘सरकारने पूर्वतयारी केली नाही ही खरं तर अडचण नसून काळा पैसा असणाऱ्यांना ‘मौका’ दिला नाही, याचाच त्रास अनेकांना होत आहे, जर त्यांना 72 तास दिले असते तर ते खुश झाले असते’, अशा कडक शब्दांत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.

रोख स्वरूपात पैसे हातात असायलाच हवेत अशी काही गरज नाही. आता रोखीशिवायही बहुतांश व्यवहार सुरळीतपणे होऊ शकतील, असे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत, असं नमूद करत मोदींना कॅशलेस व्यवहारांसाठी आग्रह धरला.

व्हॉट्सअॅप आपल्याला कोणी शिकवलं नाही मात्र आज प्रत्येक जण सहजरित्या व्हॉट्सअॅप वापरत आहे. याच पद्धतीने आपल्याला कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करावी लागेल, असं पंतप्रधानांनी पुढे स्पष्ट केलं. काळ्या पैशाविरोधाताली लढाईत ‘आम आदमी’ खऱ्या अर्थाने सैनिक बनला आहे, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close