ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचे निधन

November 25, 2016 2:18 PM0 commentsViews:

Deelip padgaonkar213

25 नोव्हेंबर :  ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि टाइम्स ऑफ इंडियाचे सल्लागार संपादक दिलीप पाडगावकर यांचं आज पुण्यातील रुबी रुग्णालयात निधन झालं. ते 72 वर्षांचे होते.

दिलीप पाडगावकर हे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक म्हणून परिचित होते. त्यांचा काश्मीर प्रश्नाबाबतचा गाढा अभ्यास होता. पाडगावकर यांनी वयाच्या 24व्या वर्षी पत्रकारितेला सुरुवात केली. युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिसमधून 1968 मध्ये त्यांना मानवता या विषयात डॉक्टरेट मिळवली. त्यानंतर ते टाइम्स ऑफ इंडियात पॅरिस प्रतिनिधी म्हणून रुजू झाले. त्यानंतर 1988पासून पुढची सहा वर्षे ते टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक म्हणून काम पाहिलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close