अोशिवरामध्ये भीषण अग्नितांडव

November 25, 2016 4:03 PM0 commentsViews:

OShiwara fire

25 नोव्हेंबर : मुंबईतील ओशिवरामधील फर्निचर मार्केटमध्ये आज (शुक्रवारी) दुपारी भीषण आग लागली. या आगीचे लोण मार्केटजवळील झोपडपट्टीच्या दिशेने पसरत गेल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं प्रयत्न सुरू आहे. आगीचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही.

ओशिवरामध्ये फर्निचरचा मोठा मार्केट आहे. या भागात शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. लाकूड असल्याने आग वेगाने पसरत गेली. आगीमुळे परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अद्याप या घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र आगीत आर्थिक नुकसान जास्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close