कांद्यानेही बळीराजाला रडवलं,कांदा 30 पैसे किलो !

November 25, 2016 9:38 PM0 commentsViews:

Onion farmer21325 नोव्हेंबर : नोटाबंदीमुळे शेतक-यांवर कुऱ्हाड कोसळली आहे. टोमॅटोनंतर आता कांद्यानेही शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. सटाण्यामध्ये चक्क 30 पैसे किलोच्या भावाने शेतक-यांना कांदा विकावा लागला आहे. मातीमोल भावाने कांद्याला भाव मिळाल्यामुळे शेतक-यांनी रस्त्यावरच कांदा फेकण्याची वेळ आलीये.

शेतक-यांचे आर्थिक स्त्रोत असणारी पिके म्हणजे कांदा आणि टोमँटो. पण याच पिकांना बाजारात कवडीमोल बाजारभाव मिळतोय. त्यामुळे बळीराजाचं आर्थिक गणित बिघडलंय. त्यातुन नोटबंदीमुळे शेतकरी हतबल झालाय.
सटाण्याच्या नामपुर बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला उन्हाळी कांदा केवळ 30 रू क्विंटल म्हणजेच 30 पैसे किलो भावाने विकला गेला. अंबासन इथं राहणारे प्रविण अहिरे यांचा हा अनुभव आहे. हा प्रचंड कोसळलेला भाव पाहुन चिराईच्या जिभाऊ धोंडगे या शेतक•याने विक्रीसाठी आणलेला कांदा मार्केट यार्डातच फेकुन दिला.

चाळीत साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा शेतक•याने विक्रीसाठी आणला होता. या शेतक-याचा वाहतुक खर्चही निघाला नाही.कधी आडत बंदी, तर कधी नोटबंदीचा फटका शेतक-यांना बसतोय. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातल्या खेडमधील शेतक-यांवरही कांदा फेकून देण्याची वेळ आलीये. खेडच्या बहिरवाडीच्या शेतक-याला कांद्याला एक रुपये किलोचा भाव मिळाल्यानं त्या शेतक-यानं कांदा माळरानावर फेकून दिला. कांदा उत्पादनाला किलोला दहा ते पंधरा रुपयांचा उत्पादन खर्च आहे. तो खर्चही मिळत नसल्यानं शेतक-यावर कांदा फेकून देण्याची वेळ आलीये. कांदा पिकवत असताना प्रतिकिलो 20 रुपये खर्च येतो. मात्र हाच कांदा बाजारात गेल्यानंतर याच कांद्याला कवडीमोल किंमत मिळत असल्याने शेतक-यांचा वाहतुकीचाही खर्चही सुटत नाहीये.यामुळे शेतकरी कंटाळलाय.

शेतकरी शेतात काबाड कष्ट करुन पोटाला चिमटा घेत काम करणारा शेतकरी हतबल होताना दिसत आहे. काही ठिकाणी टोमॅटो बाजारभाव मिळत नसल्याने रस्त्यांवर फेकला आता कांद्याचीही हिच परिस्थिती झाल्याचे दिसत आहे.शेतात पिकवलेला कांदा बाजारभाव मिळत नसल्याने वखारित साठवणूक करुन ठेवलेला 4 टन कांदा आता एका शेतक-याने डोंगरात फेकुन दिला. कांदा बाजारात नेला की 1 व 2 रुपये किलोनी कांद्याची विक्री होत नसल्याने वाहतुकीचाही खर्च वसूल होत नाही.त्यामुळे आधी खड्‌ड्यात जाण्यापेक्षा कांदा फेकुन देण्याचे चांगलं अशी परिस्थिती या शेतक-यांची झाली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close