पुणे, नागपूरमध्ये प्रत्येकी एक कोटीची रोकड जप्त

November 25, 2016 10:30 PM0 commentsViews:

pune_Cash425 नोव्हेंबर : आज सकाळपासून राज्यात 3 ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली गेलीये. नागपूर आणि पुण्यात 1 कोटींहून जास्त रक्कम जप्त करण्यात आलीये. या रक्कमेत 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा सापडल्या आहे.

पुण्यात कॅम्प परिसरात लष्कर पोलिसांनी कारवाई करत 1 कोटी 12 लाखाची रोकड हस्तगत केलीये. नागपुरात अमरावती रोडवर 1 कोटी 500 रूपयांची कॅश जप्त झाली. नागपूर एसीबीने ही कारवाई केली.याही रकमेत जुन्या नोटा सापडल्या. तर निफाडमध्ये 14 लाखांची रक्कम जप्त झालीये. या रकमेपैकी 9 लाखांची रक्कम 2000 रूपयांच्या नव्या नोटांमध्ये आहे.

नागपुरच्या जी. एच. रायसोनी कॉलेजची एक कोटी रुपयांची रोकड अँटी करप्शन ब्युरोने पकडली आहे. चलनात नसलेल्या जुन्या पाचशे आणि हजारांच्या या नोटा आहेत. रायसोनी कॉलेजचे संचालक सुनील रायसोनी यांना जळगाव हुन प्रितम रायसोनी यांनी ही कॅश पाठवल्याच एसीबीला संशय आहे. नागपुरच्या अमरावती रोडवर गोंडखैरी येथे टोलनाक्यावर एका टाटा एस गाडीतून एक कोटी पाचशे रुपयांची कॅश एसीबीने पकडली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close