मायावती यांनी रायबरेलीतील रेल्वे प्रकल्पासाठीची जमीन परत केली.

October 19, 2008 5:44 AM0 commentsViews: 3

दिनांक 19 ऑक्टोबर, रायबरेली- सोनिया गांधींचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीत रेल्वे प्रकल्पासाठी दिलेली जमीन उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी पहिल्यांदा काढून घेतली होती . पण आता ती जमीन पुन्हा त्यांनी रेल्वेला परत दिली आहे. हया 189 हेक्टर जमीनीवर रेल्वे कोच फॅक्टरी उभारली जाणार आहे. सोनियांनी ही जमीन मिळवण्यासाठी आंदोलन करण्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर ती जमीन उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींनी पुन्हा रेल्वेला परत दिली.

close