अखेर आयपीएलवर टॅक्स

May 8, 2010 10:46 AM0 commentsViews: 1

8 मे

हायकोर्टाने फटकारल्यानंतर अखेर आयपीएल फोरच्या मॅचेसवर करमणूक कर लावण्याच्या निर्णयाला राज्यसरकारने अंतिम मंजुरी दिली आहे.

हा टॅक्स पुढील मोसमात होणार्‍या आयपीएल फोरच्या मॅचेसवर आकारण्यात येणार आहे.

गेल्या 20 जानेवारीच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत आयपीएलसह सर्व टी ट्वेंटी मॅचेसवर करमणूक कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या दबावामुळे या निर्णयाला अंतिम मंजुरी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळले होते.

राज्यसरकारच्या आयपीएल टॅक्स संबंधीच्या धोरणावर हायकोर्ट आणि कॅगने कडाडून टिका केली. त्यामुळे अखेर पुढील काळात होणार्‍या आयपीलसह सर्व टी-ट्वेंटी मॅचेसवर करमणूक कर आकारण्याच्या निर्णयाला गुरुवारी मंत्रीमंडळाने अंतीम मंजुरी दिली.

विशेष म्हणजे महसूलमंत्री नारायण राणे बैठकीला गैरहजर असतानासुद्धा मुख्यमंत्र्यांनी आयपीएलवर टॅक्स लावण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

close