‘हेच अच्छे दिन’, भाजपची पोस्टरबाजी

November 26, 2016 1:11 PM0 commentsViews:

sena_bjp5426 नोव्हेंबर : नोटाबंदीवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये शितयुद्ध सुरूच आहे. आता मुंबईत त्याचा एक नवा अध्याय सुरू झालाय. वरळी भागात भाजपनं पोस्टरबाजी करत शिवसेनेला डिवचलंय.

या पोस्टरमध्ये “काळ्या पैशाचा खात्मा हेच अच्छे दिन” अशा आशयाचे पोस्टर सेनाभवनाबाहेर लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पोस्टरमध्ये बाळासाहेब आशीर्वाद देत असल्याचं दाखवण्यात आलंय. रुद्राक्षाची माळ असणारे हात आहेत. असं भासवण्यात आलंय जणू बाळासाहेब मोदींना आशीर्वाद देतायेत.

या आठवड्यात जेव्हा सेना खासदारांनी मोदींची भेट घेतली तेव्हा मोदींनी त्यांना उपदेशाचे डोस दिले. मी चांगलं काम केलंय.. मी वर गेल्यावर बाळासाहेबांना सांगू शकेन, तुम्ही काय सांगाल, असं मोदी म्हणाले होते. काल रात्रीच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी हे पोस्टर लावलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close