क्युबाच्या क्रांतीकारी चळवळीचे प्रणेते फिडेल कॅस्ट्रो यांचं निधन

November 26, 2016 2:54 PM0 commentsViews:

fidel_castro26 नोव्हेंबर : अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्ता असलेल्या राष्ट्राच्या धडा शिकवणारे क्युबातील क्रांतीकारी चळवळीचे प्रणेते फिडेल कॅस्ट्रो यांचं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. 49 वर्ष त्यांनी क्युबाची एकहाती सत्ता सांभाळली.अमेरिकेच्याविरोधात शेवटपर्यंत लढा त्यांनी लढा दिला.

फिडेल कॅस्ट्रो यांनी क्रांतीकारी ‘चे गवेरां’च्यासाथीनं क्युबन क्रांतीची मुहुर्तमेढ रोवली. सॅन्टीऍगो येथे लष्कराविरोधात आघाडी उभारून 26 जुलै 1953 रोजी संघर्षाला सुरूवात केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सुटका झाल्यानंतर ते मॅक्सिकोमध्ये गेले आणि तेथे त्यांनी बंडखोर लष्कराची स्थापना केली. आपले समर्थक आणि लष्करासह ते पुन्हा क्युबामध्ये दाखल झाले. त्यातील बहुतांशी जणांना एक तर ठार केले नाही तर अटक केले.

या कारवाईतून कॅस्ट्रोसह एक छोटा गट वाचला आणि पूर्वकडील डोंगराळ भागात जाऊन लपून बसला. त्यानंतर त्यांनी एक मोठे लष्कर उभारले आणि फुलजेन्को बटिस्ताने 1 जानेवारी 1959 रोजी क्युबातून पलायन केल्यावर सत्ता हस्तगत केली.49 वर्ष क्युबाची एकहाती सत्ता त्यांनी सांभाळली. प्रकृती खालावल्यामुळे त्यांनी 31 जुलै 2006 रोजी राष्ट्राध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. 19 फेब्रुवारी 2008 रोजी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. एखाद्या देशाचे सर्वाधिक काळ प्रमुखपद भुषवणारे कॅस्ट्रो हे एकमेव नेते आहेत.

कॅस्ट्रोंची जगभर ओळख

क्रांतीकारी ‘चे गवेरां’च्यासाथीनं क्युबन क्रांतीची
मुहुर्तमेढ रोवली

1959 ते 1976 या काळात ते पंतप्रधान
म्हणून राहिले

1976 ते 2008 पर्यंत ते क्युबाचे अध्यक्ष
म्हणून कार्यरत होते

क्युबाची एकहाती सत्ता त्यांनी 49
वर्ष सांभाळली

अमेरिकेविरूद्धच्या ‘मिसाईल’ संघर्षानं
जग तिस-या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आलं


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close