बाबासाहेबांच्या स्मारकाच्या बांधकामाची पहिली वीट कधी लागणार ?

November 26, 2016 3:44 PM0 commentsViews:

 26 नोव्हेंबर : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतराष्ट्रीय स्मारकाचं वर्षभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भूमीपूजन करण्यात आलं. मात्र वर्ष झालं तरी स्मारकाचं बांधकाम तर दूरच पण साध्या आराखड्याला अंतिम रूप येऊ शकलेलं नाही. याच बाबत आयबीएन लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरून राज्यात गेल्या 10 वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक जीवन ढवळून निघालंय. प्रत्येक राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर इंदू मिलचा विषय आहे. पण अद्यापही तो काही तडीस जाऊ शकलेला नाही. याचं कारण म्हणजे सोन्याच्या किंमतीची असलेली ही जमीन. 1424 कोटी रुपये नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनला देणार कोण आणि कसे? हा खरा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सर्व अडचणींवर मात केल्याचं जाहीर केलं. आणि 9 ऑक्टोबरला आंबेडकर स्मारकाचं भूमीपूजन केलं. पण एक वर्ष उलटूनही परिस्थिती जैसे थेच आहे.

babasaheb_smarakआंबेडकर स्मारकाचा गेल्या पंधरा वर्षांचा इतिहास
2000-01 चंद्रकांत भंडारे यांनी सर्वप्रथम जागेची मागणी केली
 विजय कांबळे यांनी ही मागणी लावून धरली

2010- राष्ट्रवादीच्या निवडणूक प्रचारात स्मारकाची मागणी
 अशोक चव्हाण यांनी मागणीचा पाठपुरावा केला.
 पृथ्वीराज चव्हाण यांनी मागणी दिल्ली दरबारी नेली.

2015- देवेंद्र फडणवीस यांच्या काळात
 नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनने जमीन हस्तांतरित केली.

इंदू मीलमध्ये आंबेडकर स्मारकाचं भूमीपूजन झाल्यानंतर वास्तुविशारद शशी प्रभू यांनी एक आराखडा तयार केला. पण या आराखड्याला अनेक दलित नेते आणि संघटनांनी आक्षेप घेतला. या ठिकाणी स्टॅच्यु ऑफ लिबर्टी प्रमाणे पुतळा उभा करावा अशी मागणी करण्यात आली. आता तर याठिकाणी बाबासाहेबांचा 300 फूटांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

इंदू मिलमधील नियोजित स्मारक कसं असेल?

साडेबारा एकरावर स्मारक
300 फूट उंचीचा पुतळा
350 कोटी रुपये अंदाजित खर्च
संग्रहालय, बौद्ध स्तूप
बौद्धधम्म दर्शन, विपश्यना केंद्र

जमीन हस्तांतरणाचा वाद मिटला असं सरकार सांगत असलं तरीही बांधकामाची पहिली वीट कधी लागणार याबाबतचं उत्तर ना केंद्र सरकारकडे आहे आणि ना राज्य सरकारकडे आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close