अमळनेरमध्ये IBN लोकमतचे प्रतिनिधी सतीश पाटलांना मारहाण

November 26, 2016 5:20 PM0 commentsViews:

26 नोव्हेंबर : अमळनेरमध्य निवडणुकीसाठी पैसे वाटप केले जात होते या घटनेचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या आयबीएन लोकमत प्रतिनिधी सतीश पाटील यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडलीये. या मारहाणीत सतीश पाटील यांच्या हाताला जबर जखम झालीये. एवढंच नाहीतर कॅमे-याची तोडफोडही करण्यात आलीये.

satish_patil4अमळनेरमधील पाठक प्लाझा येथे निवडणुकीसाठी पैसे वाटप केले जात असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी सतीश पाटील यांना मिळाली. याच माहितीच्या आधारे निवडणूक आयोगाचे कर्मचारी ही घटनास्थळी पोहचले होते. घटनास्थळी पोहचल्यानंतर स्थानिक आमदाराच्या काही समर्थकांनी सतीश पाटील यांच्यावर हल्ला चढवला. सतीश पाटील यांना जबर मारहाण करून कॅमेराची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पहाटे अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणानंतर स्थानिक पत्रकारांचा रास्ता रोको केला आणि हल्लेखोरांच्या अटकेची मागणी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close