मुंबईसाठी 72 नव्या लोकल

May 8, 2010 11:04 AM0 commentsViews: 1

8 मे

मुंबईसाठी 72 नव्या लोकल गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच मध्य आणि पश्चिम मार्गांवर काही जादा लाईन्स टाकण्यात येणार आहेत.

एमयुटीपीच्या प्रकल्पांना 1910 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य जागतिक बँकेने मंजूर केले आहे. त्यामधून मुंबईसाठी प्रत्येकी 12 डब्यांच्या 72 गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत.

तसेच जादा लोकल गाड्यांसाठी मोटरमन्सची भरती करण्यात येणार आहे. यासोबतच मध्य रेल्वेवर चार, तर पश्चिम रेल्वेवर दोन जादा लाईन्स टाकण्यात येणार आहेत.

म्हणजेच सीएसटी ते कुर्ला, मुंबई सेंट्रल ते बोरिवली आणि ठाणे ते दिवा या मार्गांवर प्रत्येकी दोन लाईन्स टाकल्या जाणार आहे. अलिकडेच जागतिक बँक आणि राज्य सरकारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

close