कोल्हापूरमध्ये संविधान दिनानिमित्त रॅली

November 26, 2016 5:36 PM0 commentsViews:

kolhapur3426 नोव्हेंबर : कोल्हापूरमध्ये आज संविधान दिनानिमित्त रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी आणि कोल्हापूरकरांनी सहभाग घेतला.

शहरातल्या दसरा चौकातल्या राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या रॅलीला सुरुवात झाली. बिंदू चौकामध्ये कोल्हापूरकरांनी आणि हजारो विद्यार्थ्यांनी संविधानाचं एकत्रित वाचन करुन प्रतिज्ञा घेतली. बिंदू चौकातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जोतिबा फुलेंच्या प्रतिमेलाही अभिवादन करण्यात आलं. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, शाहू छत्रपती महाराज यांच्यासह समाजकल्याण विभागाचे अधिकारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close