साडेसातीला ‘टाटा’ करण्यासाठी सायरस मिस्त्री शनीच्या चरणी

November 26, 2016 6:05 PM0 commentsViews:

cyars4426 नोव्हेंबर : टाटा समुहाच्या चेअरमनपदावरुन पायउतार झाल्यानंतर सायरस मिस्त्री आज शनी शिंगणापूरला पोहोचले. तिथे त्यांनी शनीचं दर्शनही घेतलं.

सध्या टाटा समूह आणि सायरस यांच्यात मोठा संघर्ष सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज सायरस मिस्त्री यांनी सहपत्नीक शिंगणापूर गाठले. अचानकपणे चेअरमनपदावरुन हकालपट्टी केल्यानंतर उद्योगजगताच एकच खळबळ उडाली. टाटाविरोधात सायरस यांनी न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू केलीये. आपल्या मागे लागलेली साडेसाती सोडवण्यासाठी शनीचं दर्शन घेतलं की काय अशी चर्चा रंगलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close