नगरपालिका निवडणुकीचा प्रचार थंडावला, उद्या मतदान

November 26, 2016 6:24 PM0 commentsViews:

election_janmat_Chachani26 नोव्हेंबर : नगरपालिका निवडणुकीचा प्रचारतोफा आज रात्री 10 वाजता थंडावला आहे. आता उद्या 164 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी पहिल्या टप्प्यासाठी  मतदान होणार आहे. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. त्यामुळे मतदारराजा कुणाच्या पदरात मत टाकतो हे पाहण्याचं ठरणार आहेय

पहिल्या टप्प्यात 164 नगरपालिका आणि नागरपंचयाती साठी सदस्य पदांच्या 3 हजार 706 जागांसाठी एकूण 15 हजार 827 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. थेट नगराध्यक्ष 147 पदांसाठी 1 हजार 13 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, पहिल्या टप्प्यातील 25 जिल्ह्यांमधील 147 नगरपरिषदा आणि 18 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 27 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होणार होते. पण विविध ठिकाणी 27 उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने आणि शिराळा नगरपंचायतीसाठी एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले नाही.

त्यामुळे आता 164 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या 3 हजार 706 जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होईल. सदस्य पदांसाठी दाखल झालेल्या एकूण 24 हजार 191 पैकी 20 हजार 716 नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. त्यातील 4 हजार 889 उमेदवारांनी माघार घेतल्याने प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात 15 हजार 827 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. या सर्व ठिकाणी 27 नोव्हेंबरला मतदानानंतर दुस-या दिवशी 28 नोव्हेंबर 2016 रोजी मतमोजणी होणार आहे.

एक दृष्टिक्षेप
164 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान
सदस्य पदांच्या 3 हजार 706 जागांसाठी लढत
सदस्य पदांसाठी 15 हजार 827 उमेदवार रिंगणात
विविध ठिकाणी 27 उमेदवार बिनविरोध
147 थेट नगराध्यक्षपदांसाठी लढत
थेट नगराध्यक्षपदासाठी 1 हजार 13 उमेदवार रिंगणात


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close