वाघाच्या पिंजाऱ्यात तरुणाची उडी, वाघालाच ‘आशीर्वाद’ देऊन आला बाहेर

November 26, 2016 9:52 PM0 commentsViews:

pune_katraj26 नोव्हेंबर : पुणे तिथे काय उणे असं उगाच म्हटलं जात नाही. पुण्याच्या कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रालयाच वाघ्याच्या पिंज-यात एक तरुणाने चक्क उडी मारली. सुधीनाम वानखेडे असं या तरुणाचं नाव आहे. या पिंज-यात फक्त उडी मारून तो थांबला नाही तर त्याने वाघाचे फोटो काढले.

त्यानंतर त्याने वाघाच्याजवळ जाऊन त्याच्या डोक्यावर हातही ठेवला. पण आश्चर्याची गोष्ट अशी की, वाघानं त्याला काहीचं केलं नाही. हा सगळा थरार 15 मिनिटं सुरू होता. थोड्यावेळाने प्राणी संग्रहालयातील कर्मचा-यांनी त्याला सुरक्षित बाहेर काढलं. त्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता सुधीनाम वानखेडे हा मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close