बॉलिवूडच्या शहेनशहाचं फिटनेस रहस्य आहे काय?

November 27, 2016 11:01 AM0 commentsViews:


27 नोव्हेंबर: बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन 74व्या वर्षीही तितकेच फिट अँड फाइन आहेत. तेवढ्याच  उत्साहानं ते काम करतात. त्यांच्या या आरोग्यपूर्ण आयुष्याचं रहस्य आहे तरी काय? पाहू या त्यांची दिनचर्या.

1.बिग बींची दिवसाची सुरुवात होते ती दोन ग्लास पाण्यानं.पाण्यात आवळ्याचा रस टाकून ते पाणी सकाळी उठल्या उठल्या ते पितात.

2. ब्रेकफास्टमध्ये शहेनशहा स्प्राउट, कॉर्नप्लेक्स,ओट आणि उकडलेलं अंडं खातात. अमिताभ बच्चनला पास्ताही आवडतो. ब्रेकफास्टला ते फळं आणि ज्युसही घेतात. ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण यामध्ये ते ग्रीन टी घेतात.

3. बिग बींचं दुपारचं जेवण म्हणजे हिरव्या भाज्या आणि डाळ-रोटी. त्यांना भेंडीची भाजी जास्त आवडते.

4. अमिताभ बच्चनना चायनीज फूडही आवडतं. मुंबईत शूट असेल तर त्यांचं जेवण घरून येतं. नैनितालचा एक आचारी त्यांच्या घरी जेवण बनवतो.

5. अमिताभ दारू तर पित नाहीच. पण ते चहा-कॉफीलाही शिवत नाहीत.

6. रात्री झोपताना ते एक ग्लास दूध पितात.

7. बिग बी रोज जिममध्येही जातात.

close