हृतिकची पत्रकारांना धक्काबुक्की

May 8, 2010 11:53 AM0 commentsViews: 3

8 मे

अभिनेता हृतिक रोशनने शिर्डी इथे आज पत्रकारांना धक्काबुक्की केली.

साईबाबांच्या दर्शनासाठी हृतिक सहकुटुंब आला होता. मंदिरात दर्शन घेत असताना कॅमेरे बंद करा म्हणत मीडियाच्या लोकांवर तो धावला.

पत्रकारांना त्याने धक्काबुक्की करत बाहेर काढले. यावेळी हृतिकचे वडील राकेश रोशन तिथे होते.त्यांनी हृतिकला आवरलं आणि पत्रकारांची माफी मागितली.

दर्शनासाठी आलेल्या हृतिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्याला एकटे सोडण्यात यावे, अशी विनंती मीडियाच्या प्रतिनिधींना केली होती. पण तरीही त्यांनी आपल्याला त्रास दिला, असे हृतिकच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

तसेच हृतिकने त्यांना धक्काबुक्की केली नाही, असा दावाही या प्रवक्त्याने केला.

close