ठाण्यात भरधाव कारने 2 भावंडांना चिरडलं, चालकाला अटक

November 27, 2016 2:09 PM0 commentsViews:

27 नोव्हेंबर :  ठाण्यातील नौपाडा परिसरातील वळणावर एका भरधाव कारने रस्ता ओलांडणाऱ्या दोघा भावंडांना चिरडल्याची घटना घडली आहे. शाळेतून परतत असताना झालेल्या या अपघातात हे दोन्ही भावंडं गंभीर जखमी झाले आहेत. या दोन्ही भावंडांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर याप्रकरणी वाहन चालक दिलीप गुंजाळ याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

vlcsnap-9411-03-10-04h07m39s961

एका खासगी शिकवणी घेणार्‍या दिलीप गुंजाळनं अचानक लहान मुलं समोर आल्यावर ब्रेक दाबाण्या ऐवजी ऍक्सीलेटर दाबला आणि हा धक्कादायक अपघात घडलाय.  आपल्या व्हॅगन आर कारने तो घरी परतत असताना हा अपघात घडला आहे. नौपाड्यातील एका वळणावर त्याने पार्थ कोटक आणि जिया कोटक या भावंडांना चिरडले.

दोन्ही जखमी भावंडांना ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पार्थची प्रकृती स्थिर असून जियाची प्रकृती गंभीर आहे. मुलांना चिरडल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहन चालकाला लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close