पंजाब नभा जेल : पंजाब जेलमधून खलिस्तानच्या अतिरेक्यासह 4 कैद्यांना पळवलं

November 27, 2016 2:42 PM0 commentsViews:

nabha-jail

27 नोव्हेंबर :  पंजाबमधील नाभा जेलमध्ये 10 बंदुकधाऱ्यांनी हल्ला करून खलिस्तानी अतिरेक्यांचा प्रमुख हरमिंदर सिंह मिंटूला त्याच्या पाच साथीदारांसह पळवून नेलं आहे. या घटनेनंतर पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून ठिकठिकाणी नाकाबंदी आहे. तसंच, शेजारच्या हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमध्येही पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेत.

10 बंदुकधारी हे पोलिसांचे कपडे परिधान करुन अंदाधुंद गोळीबार करत हरमिंदर सिंग मिंटूला पळवून नेलं. पोलीस आणि सैन्यदल घटनास्थळी पोहोचले असून आरोपींना पकडण्यासाठी तपासकार्य सुरू झालं आहे. मिंटूसोबत गँगस्टर विकी गोंडर, गुरप्रीत शेखो, नीता देओल आणि विक्रमजीत सिंह यांचा समावेश आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close