कराडमध्ये भाजप नेत्याची महिला पोलिसाला दमबाजी

November 27, 2016 4:16 PM0 commentsViews:

 karad_$

27 नोव्हेंबर : कराड नगरपालिकेसाठी चुरशीने मदतान सुरू आहे. सकाळपासून मतदान सुरळीत सुरू असतानाच भाजप नेत्यांनी दमबाजी करायला सुरूवात केलीय. वॉर्ड क्रमांक एकमध्ये भाजपच्या शेखर चरेगावकर यांनी बुथवर महिला पोलीस कर्मचा-याला दमबाजी केली. दया डोहीपोडे असं महिला पोलीस कर्मचा-याचं नाव आहे.

चरेगावकर हे सहकार बोर्डाचे अध्यक्षही आहेत. मतदार आणि उमेदवार नसताना तुम्ही या ठिकाणी का आलात असं विचारल्यामुळे संतापलेल्या चरेगावरकर यांनी डोहीफोडे यांना दमबाजी केली. त्यामुळे काहीसं तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय. मात्र या भागात पोलिसांनी धरपकड केल्यानंतर तणाव निवळला. या तणावग्रस्त भागात जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी पत्रकारांसी जिल्ह्यात शांतता असल्याच ते सांगत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close