संविधान दिन हा राष्ट्रीय सणासारखा साजरा व्हावा -मंदार फणसे

November 27, 2016 5:20 PM0 commentsViews:

28 नोव्हेंबर : चंद्रपुरात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  संविधान दिन हा राष्ट्रीय सणासारखा साजरा व्हावा. त्याबरोबरच संविधानाचं महत्त्व सर्वांना समजणं ही काळाची गरज असल्याचं मत आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे यांना व्यक्त केलं. तर संविधानाचं केवळ वाचन करून चालणार नाही तर त्याची धोरणं गंभीरतेने अमलात आणणं गरजेचं असल्याचं मत माजी सनदी अधिकारी ई झेड खोब्रागडे यांनी व्यक्त केलं.

mandar_phanseचंद्रपुरात काल संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आबेडकर विचारसंवर्धन समितीने संविधानाचा जागर कार्यक्रम यावेळी आयोजित केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधानाच्या प्रास्ताविकतेची शपथ देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या कार्यक्रमाला माजी सनदी अधिकारी ई. झेड खोब्रागडे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक किशोर मानकर आणि आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे उपस्थित होते. या कार्यक्रमात संविधानाचे महत्व संविधानाची गरज यावर वक्त्यांनी भर दिला संविधानाचा वाचन करुन भागणार नाही. त्याची धोरणे गंभीरतेने अमलात गरज आहे असं मत यावेळी ई झेड खोब्रागडे यानी व्यक्त केलं.

तर वैज्ञानिक दृष्टीकोन प्रत्यक्षात अमलात आणण्याची गरज असल्याचं मत किशोर मानकर यांनी व्यक्त केलं. दरम्यान, आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे यांनी बोलताना संविधान दिन हा राष्ट्रीय दिनासारखा साजरा व्हावा आणि आजच्या काळात संविधानाच महत्त्व कळणे ही काळाची गरज असल्याचं मत यावेळी व्यक्त केलं.महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारसंवर्धन समितीने संविधानाचा जागर या कार्यक्रमंाचं आयोजन करण्यात आलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close