नगरपरिषदांचं मतदान संपलं, दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद

November 27, 2016 6:34 PM0 commentsViews:

maharashtra_elections201427 नोव्हेंबर : राज्यातल्या 25 जिल्ह्यातल्या 164 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान झालं. तुरळक प्रकार वगळता राज्यात शांततेत मतदान पार पडलं. सरासरी 68 टक्के मतदान झालंय.  उद्या या 164 नगर परिषदांचे निकाल लागणार आहे. यावेळी नगराध्यक्ष राज्याची मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीये.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खऱ्या अर्थानं ही जनमत चाचणी असणार आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर ही पहिलीच मोठी निवडणूक असणार आहे. या निवडणुकीसाठी जवळपास संपूर्ण मंत्रिमंडळानं प्रचारासाठी राज्य पिंजून काढलं होतं. तर विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीये.

 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close