अमळनेरमध्ये आमदार आणि माजी नगराध्यक्षांमध्ये हाणामारी

November 27, 2016 8:12 PM0 commentsViews:

amlner327 नोव्हेंबर : जळगाव अमळनेरचे अपक्ष आमदार शिरीष चौधरी आणि शहर विकास आघाडीचे प्रमुख अनिल भाईदास पाटील यांच्यात फ्रिस्टाईल हाणामारी झाली. यात अनिल पाटील गंभीर जखमी झाले आहे. या घटनेनंतर शहर विकास आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. संतप्त कार्यकर्त्यांनी गाड्याची तोड़फोड केली. तर आमदार शिरीष चौधरी यांच्या कार्यालयाचीही तोडफोड केली.

आर के नगर परिसरात मतदाराना शिरीष चौधरी समर्थकान कडून पैसे वाटप केले जात होते. त्याचा जब विचारण्यासाठी अनिल पाटील त्या ठिकाणी पोहचले. त्यावरुन आमदार शिरीष चौधरींसोबत वाद झाला आणि वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. ही बातमी शहरात वाऱ्या सारखी पसरली. त्यांच्या पडसाद शहरात उमटले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. आणि कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्जही केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close