पिंपरीत चिमुरडीवर अल्पवयीन मुलांचा सामूहिक बलात्कार

November 27, 2016 7:38 PM0 commentsViews:

rape-victims-27 नोव्हेंबर : पिंपरी-चिंचवडमध्ये एका सहा वर्षांच्या चिमुरडीवर अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीये. पिंपरीच्या अण्णा साहेब मगर झोपडपट्टीतील ही घटना आहे. याप्रकरणी चौघाही पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

ही चिमुकली खेळत असताना दोघांनी तिला निर्जनस्थळी नेऊन चौघांनी तिच्यावर अत्याचार केला. घडला प्रकार चिमुकलीने तिच्या आईला सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आलाय. दरम्यान, पीडित मुलीवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी आज रुग्णालयात जाऊन पीड़ित मुलीची भेट घेतली. या घटनेतील मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत असून या मुलीवर अत्याचार करणा•या चारही अल्पवयींन आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती नीलम गोरे यांनी संागितलंय. अटक करण्यात आलेले चारही आरोपी जरी अल्पवयींन असले तरी हे आरोपी जास्तीत जास्त वेळ सुधारगृहात राहतील यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती गोऱ्हे यांनी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close