निकालाआधीच शिवसैनिकांनी काढली विजयी मिरवणूक

November 27, 2016 9:06 PM0 commentsViews:

khed27 नोव्हेंबर : नगरपरिषदा आणि नगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान संपलं. पण, खेडमध्ये शिवसैनिकांनी निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच उमेदवारांची विजयी मिरवणूक काढली.

अतिउत्साही शिवसैनिकांनी मतदानानंतरच उमेदवारांची विजयी मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला. रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली आपण नक्की यशस्वी होऊ असा विश्वास या शिवसैनिकांना वाटतोय. त्यामुळेच हा जल्लोष साजरा केल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र शिवसैनिकांचा हा अतिआत्मविश्वास पाहून त्यांना काय म्हणावं हेच सर्वसामान्य नागरिकांना कळत नव्हतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close