‘पिंक’चं संयुक्त राष्ट्राच्या मुख्य कार्यालयात स्क्रीनिंग

November 28, 2016 9:16 AM0 commentsViews:

pink-box-office-collection-day-1-759

28 नोव्हेंबर: अमिताभ बच्चनचा पिंक सिनेमा न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्राच्या मुख्य कार्यालयात दाखवला जाणार आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना आवाज उठवणाऱ्या या सिनेमाला खास आमंत्रण दिलं गेलंय.बिग बींनी ट्विट करून हे सांगितलं.

अमिताभ म्हणतात की,’ सहाय्यक महासचिव यांनी  पिंक सिनेमाला खास आमंत्रण दिलंय. हा आमचा गौरव आहे.’ अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित पिंक सिनेमाचं सगळ्या ठिकाणी कौतुक झालं. त्यातली अमिताभची भूमिका खास ठरली होती. सिनेमात तापसी तन्नू,एंड्रिया तारियांग आणि कीर्ती कुल्हारी यांनी व्यक्तिरेखा साकारल्यात. पिंक 16 सप्टेंबरला रिलीज झाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close