पुणे विद्यापीठाचा अजब कारभार…

May 8, 2010 1:14 PM0 commentsViews: 1

8 मे

पुणे विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराचा एक नमुना आज पुढे आला. बी.फार्मच्या शेवटच्या वर्षाच्या परिक्षेच्या पहिल्याच दिवशी चुकीची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातात पडली. पेपरवर नाव होते, फार्मास्युटिकल्स – 4, मात्र प्रश्न होते बायोफार्माचे…

याबाबत विद्यापीठाशी संपर्कही होत नव्हता. त्यामुळे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या पुणे, नाशिक, नगर या परिसरातील 55 कॉलेजेसमध्ये यामुळे गोंधळ उडाला.

शेवटी विद्यापीठाने फोनवर हा पेपर 30 मे रोजी पुढे ढकलण्याच्या सूचना दिल्या. मात्र शेवटच्या वर्षाला असलेल्या या विद्यार्थ्यांच्या पुढील प्लॅन्सचा त्यामुळे बोजवारा उडाला.

close