परळीत भावाची बाजी, पंकजाताईंचा पराभव

November 28, 2016 2:50 PM0 commentsViews:

dhanjay_munde_pankaja_munde28 नोव्हेंबर : नगरपरिषद निवडणुकांचे निकाल आता हाती आले आहे. परळीत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. अखेर निकालअंती या लढतीत भावाने बाजी मारलीये. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा दणदणीत विजय झालाय.राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोजिनी हालगे 6500च्यावर मतांनी विजयी झाल्या आहे.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातली शितयुद्ध अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीकेची संधी सोडत नाही. परळी नगरपरिषदेच्या आखाड्यातही धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकमेकांसमोर उभे ठाकले. दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठापणा लागली होती. आज मतमोजणीत सकाळपासून राष्ट्रवादीने आघाडी घेतली आणि ती कायम राखली. परळी वैजनाथ अंतिम निकालात राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सरोजिनी हालगे 6500 मतांनी विजयी झाल्या. राष्ट्रवादीने 27 जागा जिंकत भाजपला चांगलाच दणका दिला. भाजपला 4 जागांवर समाधान मानावे लागेल. तर शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी 1 जागा मिळाली. धनंजय मुंडेंनी गड काबीज करत भाऊच मोठा दाखवून दिलं. पंकजा मुंडेंनी जनतेनं दिलेला कौल स्वीकारला असून पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close